२५ अवतीभवती होणारे बदल
प्रश्न १) रवंथ करणे म्हणजे काय?
उत्तर- काही प्राणी पोट भरेपर्यंत चरतात. नंतर पोटातील अन्न थोडे थोडे तोंडात आणून चघळतात. हे चघळलेले अन्न परत गिळतात. त्याला रवंथ करणे म्हणतात. रवंथ केल्यामुळे या प्राण्यांना अन्न नीट पचते. गाई, म्हशी रवंथ करणारे प्राणी आहेत.
प्रश्न २) निशाचर प्राणी म्हणजे काय?
उत्तर- काही प्राणी दिवसा विश्रांती घेतात. अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात. अशा प्राण्यांना निशाचर म्हणतात. उदाहरण वाघ, वटवाघुळ, घुबड हे निशाचर प्राणी आहेत.
प्रश्न ३) पौर्णिमा कशाला म्हणतात?
उत्तर- ज्या दिवशी चंद्र आकाशात गोल गरगरीत दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात.
प्रश्न ४) अमावस्या कशाला म्हणतात?
उत्तर- पौर्णिमेनंतर चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. पंधराव्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसनाही. त्या दिवसाला अमावस्या म्हणतात.
प्रश्न ५) चंद्र कला म्हणजे काय?
उत्तर- अमावस्येच्या नंतर पंधरा दिवस चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो आणि पुढच्या पौर्णिमेला तो पुन्हा गोल गरगरीत दिसतो. दररोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्या आकारांना चंद्राच्या 'कला' म्हणतात.
जरा डोके चालवा.
प्रश्न ६) तुमची सावली अगदी लहान असते त्या वेळी सूर्य कोठे असतो?
प्रश्न ७) चंद्राची कोर म्हणजे काय?
प्रश्न ८) एका अमावस्येपासून पुढची अमावस्या किती दिवसांनी येते?
प्रश्न९) सकाळच्या वेळेस उमलणाऱ्या फुलांची यादी करा.
Post a Comment