२३. वय जसे जसे वाढते
स्वाध्याय
प्रश्न १) वयाच्या कितव्या वर्षापर्यंत व्यक्तीची वाढ होत असते?
उत्तर- वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत व्यक्तीची वाढ होत असते.
प्रश्न २) प्रकृती उत्तम राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची मदत होते?
उत्तर- चांगल्या सवयी, चांगला आहार यांच्यामुळे प्रकृती उत्तम राहायला मदत मिळते.
प्रश्न ३) वनस्पतीला फुले कधी येऊ लागतात?
उत्तर- योग्य वाढ झाली की वनस्पतीला फुले येऊ लागतात.
प्रश्न ४) बीजांकुरण म्हणजे काय?
उत्तर- वनस्पतींच्या बियांना कोंब फुटतो. त्याला अंकुर म्हणतात. म्हणून कोंब फुटण्याला बीजांकुरण असे म्हणतात.
प्रश्न ५) बाळाला लसी का देतात?
उत्तर- बाळ मोठे झाल्यानंतर पुढे त्याला काही आजार होऊ शकतात. ते होऊ नयेत म्हणून लसी देतात.
रिकाम्या जागी योग्य शब्द भरा
१) घरात बाळ जन्माला येते त्याचा घरादाराला ..................होतो.
२) नियमित. .........केला तर त्याचा फायदा होतो.
३) फुलांपासून .........तयार होतात.
Post a Comment