१९.माझी शाळा
माहित आहे का तुम्हाला?
आपल्या देशात खूप वर्षापूर्वी विद्यार्थी, मुले शिक्षकांच्या(गुरूंच्या) घरी शिक्षण घेण्यासाठी जात असत. काही वर्षे ते तेथे राहून शिक्षण घेत असत. नंतरच्या गावामध्ये एक शिक्षक आणि विविध वयोगटातील विद्यार्थी एकत्र येत असत. शिक्षक त्यांना शिकवत असत. विद्यार्थी जमिनीवर अक्षरे, आकडे गिरवत असत. या काळात मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था दुर्मिळ होती. इंग्रजांनी सध्याची शाळा पद्धत आणल्यावर महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणास पुण्यातून सुरुवात केली.
स्वाध्याय
अ) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) शाळेत कोणते खेळ खेळायला मिळतात?
उत्तर- शाळेत आपल्याला खो-खो, कबड्डी, लेझीम, लंगडी यासारखे खेळ खेळायला मिळतात.
२) शाळेत कोणत्या सुविधा असतात?
उत्तर- शाळेत वाचनालय, मैदान, संगणक कक्ष इत्यादी सुविधा असतात.
३) वाद कोणत्या मार्गाने सोडवले पाहिजेत?
उत्तर- वाद समजुतीने व शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजे.
आ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
१) शाळेत वेळेवर जाण्यामुळे आपल्याला. ...........ची सवय लागते.
२) वाचनालयातील ........वेळेत परत करावी.
३) प्रत्येक मुला-मुलीला शाळेत जाण्याची. ........मिळाली पाहिजे.
Post a Comment