१. आपल्या अवतीभवती .
आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत. काही सजीव आहेत काही निर्जीव आहेत.
सजीव स्वतःहून हालचाल करतात.
सजीवांना अन्नाची गरज असते. अन्न खाऊन त्यांची वाढ होते.
त्यांच्यापासून त्यांच्या सारखेच सजीव तयार होतात.
सजीवांमध्ये काही प्राणी असतात तर काही वनस्पती असतात.
सजीवांच्या सर्व गरजा परिसरातूनच भागतात. निर्जीव वस्तूंमध्ये ही सजीवांमुळे बदल घडून येतात.
परिसरातील सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असतात.
स्वाध्याय
अ) गाळलेले शब्द भरा.
(बदलते, कापड, गळतात)
१) कोणी उचलून हलवले तर दगडाची जागा. .............
२) कापूस लोकर आणि रेशीम यापासून आपण. ..........विणतो.
३) झाडांची पाने.......तीही मातीत पडून असतात.
आ) खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
१) माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात?
उत्तर- माणसाला परिसरातून अन्न, वस्त्र, निवारा या विषयी आवश्यक वस्तू मिळतात.
२) वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते?
उत्तर- पाणी आणि हवा परिसराचे घटक आहेत. वनस्पतींना ते परिसरातून मिळतात.
३) जंगलातील माती कशामुळे कसदार होते?
उत्तर- मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात ते मातीत मिसळतात. झाडांची पाने गळतात तीही मातीत पडून कुजतात. त्यामुळे जंगलातील माती कसदार होते.
इ) चुक की बरोबर ते सांगा.
१) काही वनस्पतींच्या बिया वार्यामुळे विखुरल्या जातात. (चूक/बरोबर)
२) वनस्पती निर्जीव आहेत. (चूक/बरोबर)
३) किडे आणि धान्य चिकन खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते. (चूक/बरोबर)
Post a Comment