वाचा व लिहा .
कुंदापूरजवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची .आठ-नऊ वर्षाची शिवानी ,होती भारी चतुर .शाळा,घर,शेत व बाजार येथील मुले-माणसे,सगळेच तिच्यावर खुश असायचे.
रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा .शेतातील भाजी विकायला शिवानीचे आईबाबा जायचे.सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची.शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची.अन मधून मधून बाजारात चक्कर मारायची .भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग .एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली.मिठाई पाहत ती सहज उभी होती.हलवाई तिच्याकडे पाहत होता.तो गल्ल्यावरून उठून शिवनीकडे आला .ए ,मुली !चल पैसे काढ .कसले पैसे? मघापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस,त्याचे पैसे.अहो,पण मिठाईचा वास तर येणारच ना !म्हणून काय,वासाचे पैसे द्यायचे ?पैसे दिलेच पाहिजेत ,म्हणून हलवाई ओरडू लागला .हळूहळू बघ्यांची गर्दी जमली .
काय माणूस आहे हा। नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो.वासाचे पैसे ? खुळाच दिसतोय ।
शिवानीला काहीतरी सुचले .ठीक आहे,थांबा .मी पैसे घेऊन येते, असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबाबांकडे निघाली.
Post a Comment