२. अबब! किती प्रकारचे हे प्राणी?
गरुड आकाशात उंच उडतो. गाय जमिनीवर चालते. मासे पाण्यात पोहतात. बगळा पांढरा असतो. कावळा काळा असतो. म्हैसही काळी असते. मोर रंगीबेरंगी असतो. घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात. शेळी आणि कुत्रा मध्यम असतात. उंदीर आणि खार लहान असतात. अशा प्रकारे प्राण्यांमध्ये खूप विविधता आढळते.
सांगा पाहू
खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते?
संथ गतीने जाणारे प्राणी कोणते?
आपण गाई का पाळतो?
आपल्या उपयोगी पडणारे प्राणी कोणते?
स्वाध्याय
अ) पुढील वाक्य पूर्ण करा.
सर्व कावळे. .....असतात.सर्व पोपट.......असतात.पण गाईचा रंग वेगवेगळा असतो. गाई काळ्या,........किंवा......असतात.
आ) पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.
प्रश्न १) कोणकोणत्या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते?
उत्तर- गाई, म्हैस, शेळी या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते.
प्रश्न २) घरात उंदीर का नको असतात?
उत्तर -उंदीर आणि घुशी साठवणीतले धान्य फस्त करतात. शिवाय घरातील वस्तू कुरतडतात. त्यामुळे घरात उंदीर घुशी नको असतात.
प्रश्न ३) माशांचा संचार कुठे असतो?
उत्तर- माशांचा संचार पाण्यामध्ये असतो.
प्रश्न ४) अंगावर पिसे असणारे प्राणी कोणते?
उत्तर- मोराच्या अंगावर रंगीबरंगी पिसे असतात. त्याचप्रमाणे कावळा पोपट,बगळा यांच्या अंगावर ही पिसे असतात.
प्रश्न ५) पक्ष्यांना किती पाय असतात? कीटक कोणाला म्हणतात?
उत्तर- पक्ष्यांना दोन पाय असतात. तर सहा पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात. उदाहरण -फुलपाखरे, डास, माशा, झुरळे हे किटक आहेत.
Good
ReplyDeletePost a Comment