३.निवारा आपला आपला
सांगा पाहू
पक्षी घरटे बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात?
बिळात कोणकोणते प्राणी राहतात.
पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात? त्यांची राहण्याची सोय कोण करते?
घराची गरज कशासाठी?
कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा, रणरणते ऊन, मुसळधार पाऊस यांचा आपल्याला त्रास होतो. त्यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो. घरामुळे चोरीची भीती कमी होते.
स्वाध्याय
अ) गाळलेले शब्द भरा.
१) सगळ्या पक्षांची घरटी ..........नसतात.
२) .......नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो.
३) काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच. ........करत नाहीत.
४) वाघ, बिबटे,.......डोंगराच्या गुहेत राहतात.
५) घोड्याच्या निवार्याला. .........म्हणतात.
आ) पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न १) शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी काय वापरतो?
उत्तर- शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल वापरतो.
प्रश्न २) अंडी खाणार्या प्राण्यांना सुगरणीच्या घरट्यात जाणे अवघड का असते?
उत्तर- कारण, सुगरण घरट्यासाठी पाण्या जवळची काटेरी झाडे पसंत करतात. झाडांच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात. त्यातल्या उंचावरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते.
प्रश्न ३) पक्षी आपले घरटे आतून मऊ आणि उबदार कसे करतात?
उत्तर- पक्षी आपले घरटे आतून मऊ आणि उबदार करण्यासाठी घरट्यात कापूस, दोरीचे किंवा सुतळीचे तुकडे वापरतात.
प्रश्न ४) सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी सहसा का येत नाहीत?
उत्तर- सिमेंट मध्ये बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी सहसा येत नाहीत कारण, सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही.
प्रश्न ५) अंधाऱ्या गुहांमध्ये राहणारी वटवाघुळे आणखी कुठे निवारा शोधतात?
उत्तर- अंधाऱ्या गुहा मध्ये राहणाऱ्या वटवाघूळ जुन्या पडक्या किंवा ओसाड इमारतीमध्ये निवारा शोधतात.
Post a Comment