१७. सुंदर दात, स्वच्छ शरीर!
सांगा पाहू.
१)तूमच्या वर्गातल्या किती जणांचे दात पडले आहेत?
२)ज्यांचे दात पडले आहेत त्यांना पुन्हा नवे दात येतील का?
३)काही आजींचे किंवा आजोबांचे सगळे दात पडतात त्यांना पुन्हा नवे दात येतात का?
दातांची काळजी
काहीही खाल्ले की तोंड धुवावे. चूळ भरावी. दातांवरून आतून आणि बाहेरून बोट फिरवावे. खुळखुळून पाच-सहा वेळा चुळा भराव्यात.
स्वाध्याय
अ) जरा डोके चालवा.
१) दात स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती? का?
उत्तर- ब्रश आणि पेस्ट वापरली तर दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात. शिवाय तिचा फेस होतो, त्यामुळे फटीमध्ये अडकलेले कण बाहेर पडायला मदत होते. ही दात स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पद्धत होईल.
२) नखे का वाढू देऊ नयेत?
उत्तर- खेळताना कामे करताना हात अस्वच्छ होतात. जेवताना नखात अडकलेली घाण पोटात जाते. त्यामुळे पोट बिघडते. म्हणून नखे वाढू देऊ नये.
३) हिरड्या खराब का होतात?
उत्तर- जेवण केल्यानंतर अन्नाचे कण तोंडात राहतात. दातांना आणि जिभेला चिटकुन बसतात. दातांमधील फटी मध्ये अडकतात. ते तसेच तोंडात राहिले तर कुजतात. असे वारंवार होत असेल तर हिरड्या खराब होतात.
४) काहीही खाल्ले की तोंड कसे धुवावे?
उत्तर- काहीही खाल्ले की तोंड धूवावे.चूळ भरावी. दातावरून आतून आणि बाहेरून बोट फिरवावे. खुळखुळून पाच-सहा वेळा चुळा भराव्यात.
५) तोंड धुण्यासाठी ब्रश आणि पेस्ट वापरण्याचे फायदे कोणते?
उत्तर- ब्रश आणि पेस्ट वापरली तर दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात. शिवाय पेस्टचा फेस होतो. त्यामुळे फटीमध्ये अडकलेले कण बाहेर पडायला मदत होते.
आ) गाळलेले शब्द भरा.
( कण, दुधाचे दात, पेस्ट, ज्ञानेंद्रिये, जीभ)
१) ...............सातव्या-आठव्या वर्षी पडतात.
२) कुजलेले. ........तोंडात राहिले की त्याचा परिणाम होऊन दात पडतात.
३) ब्रश आणि. ......वापरली तर दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात.
४) दात घासताना. ........आणि हिरड्या ही स्वच्छ कराव्यात.
५) पाच ........स्वच्छता ठेवायला हवी
Post a Comment