२४.आपले कपडे
खालील प्रश्नांची उत्तरे पहा व लिहा.
प्रश्न १) तुम्ही एका वर्षात कोणकोणते ऋतू अनुभवता?
उत्तर- एका वर्षामध्ये उन्हाळा ,पावसाळा व हिवाळा हे ऋतू अनुभवण्यास मिळतात.
प्रश्न २) ऋतूनुसार कपड्यांमध्ये बदल का करावा लागतो?
उत्तर- निसर्गात ऋतूनुसार अनेक बदल होत असतात. त्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी माणसाला आपल्या कपड्यांमध्ये बदल करावा लागतो.
प्रश्न ३) गणवेश घालावा लागतो अशा तीन व्यवसायांची नावे लिहा?
उत्तर- गणवेश घालावा लागतो असे व्यवसाय- सैनिक, पोलीस, बस कंडक्टर, बस ड्रायव्हर, डॉक्टर.
प्रश्न ४) सैनिकांचे गणवेश नैसर्गिक परिस्थितीशी मिळते-जुळते का असतात?
उत्तर- कारण शत्रूच्या सैन्याला सहजपणे लक्षात येऊ नये म्हणून अशी युक्ती केलेली असते. उदाहरण- वाळवंटी प्रदेशात खाकी कपडे, जंगली प्रदेशात हिरवे, तर हिमालयासारख्या बर्फाळ प्रदेशात पांढरे कपडे सैनिक वापरतात.
प्रश्न ५) मी कोण?- पांढरा कोट घालून मी लोकांना तपासतो.
उत्तर-मी डाॅक्टर
प्रश्न ६) खाकी कपडे घालून मी तुम्हाला नेहमी दिसतो. भांडण-तंटे झाले तर मी तिथे पोहोचतो.
उत्तर-मी पोलीस
Post a Comment