प्रश्न १) मुख्य दिशा किती व कोणत्या आहेत?
उत्तर- मुख्य दिशा चार आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण.
प्रश्न २) पूर्व दिशा कशी ओळखायची?
उत्तर- दिशा ठरवण्यासाठी आपल्याला उगवत्या सूर्याचा उपयोग होतो. सूर्य उगवतो त्या दिशेला पूर्व दिशा म्हणतात.
प्रश्न ३) पूर्व दिशेच्या समोर कोणती दिशा असते?
उत्तर- पूर्व दिशेच्या समोर पश्चिम दिशा असते.
प्रश्न ४) उत्तर दिशेच्या समोरील दिशा कोणती असते?
उत्तर- उत्तर दिशेच्या समोर दक्षिण दिशा असते.
प्रश्न ५) नकाशात बाणाच्या चिन्हाने दाखवलेली दिशा कोणती असते?
उत्तर- नकाशात बाणा च्या साह्याने दाखवलेले दिशा उत्तर दिशा असते.
प्रश्न ६) चुंबकाची सुई कोणत्या दिशा दाखवते?
उत्तर- चुंबकाची सुई उत्तर व दक्षिण दिशा दाखवते.
प्रश्न ७) नकाशात सूची कशाला म्हणतात?
उत्तर- नकाशात द्यायची माहिती ही चिन्ह, चित्रे, खुणा रंगांच्या छटा यांच्या मदतीने दाखवतात. त्यांची यादी नकाशात दिलेली असते. तिला सूची असे म्हणतात.
Post a Comment