एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला चार मुले होते. ती मुले सतत भांडत असत. आपल्या नंतर आपल्या मुलांचे काय होईल, अशी काळजी सतत त्या शेतकऱ्याला वाटत असे. एके दिवशी तो खूप आजारी पडला. त्याने आपल्या मुलांना बोलावले व त्यांच्या हातात एक एक काठी दिली. त्या काठ्या मुलांना मोडायला सांगितल्या. मुलांनी देखील त्या लगेच मोडल्या. थोड्या वेळाने त्याने चार काठ्या एकत्र करून एक मोळी तयार केली. ती एक, एक करून प्रत्येकाच्या हातात घेऊन मोडायला सांगितले, पण आता कोणालाही ती मोडता आली नाही. यावरून तुम्हाला काय शिकवण मिळाली असे त्याने विचारले. तेंव्हा मुलांच्या लक्ष्यात त्यांची चूक आली आणी ते म्हणाले की एकीचे बळ खुप महत्वाचे आहे. आम्ही भांडण न करता एकोप्याने राहिले पाहिजे. तेव्हापासून चारही भाऊ प्रेमाने राहू लागले.
Post a Comment