माकड आणि मगर
एका तळ्यात एक मगर राहत होती. सकाळी, सकाळी ऊन खाण्यासाठी मगर तळ्याबाहेर येत. जवळच एका झाडावर माकड आंबे खाण्यासाठी येत असत. आंबे खाऊन झाल्यावर माकड काही आंबे त्या मगरीच्या अंगावर टाकत. गोड आंबे खाऊन मगरीला खूप आनंद वाटायचा. माकड आणि मगर या दोघांची मैत्री झाली. माकड रोज चांगले, चांगले आंबे मगरीला द्यायचा. एक दिवस माकडाने थोडी जास्त आंबे त्याच्या बायकोसाठी दिली. मगरीने ते आंबे आनंदाने आपल्या बायकोला दिली. ती गोड आंबे खाऊन मगरीच्या बायकोच्या मनात पाप आले. ती आपल्या नवर्याला म्हणाली, "अहो, आंबे किती गोड आहेत. त्या माकडाचं काळीज किती गोड असेल. मला माकडाचं काळीज हवे. खरंतर मगरीला हे पटलं नाही. पण बायकोच्या आग्रहामुळे तो माघारी निघाला. मगर तळ्याच्या किनारी आले. माकड आंब्याच्या झाडावर होते. मगर माकडाला म्हणालं, "अरे मित्रा, तुझे आंबे खाऊन बायको खूप खुश झाली आहे. चल, आज तुला माझ्या घरी मेजवानी देतो. मेजवानी म्हटल्यावर माकडाने पटकन उडी मारली. आणि ते मगरीच्या पाठीवर बसले. काही अंतर गेल्यावर मगरीने माकडाला सांगितले, अरे मित्रा तुझे गोड आंबे खाऊन माझ्या बायकोला तुझं काळीज खाण्याची इच्छा झाली.हे एकून माकड मनातून घाबरले. पण तसे न दाखवता ते मगरीला म्हणाले, "अरे एवढेच ना, पण आम्ही माकडं आमचे काळजी झाडावर ठेवतो." माघारी चल तुला काळीज देतो. मूर्ख मगरीला समजलच नाही की काळीज झाडावर कसे असेल. ते माघारी फिरले. तळ्याच्या किनारी येताच माकडाने मगरीच्या पाठीवरून उंच उडी मारली, आणि चटकन झाडावर गेले. माकड म्हणाले, "मूर्ख मगरी. काळीज कुठे झाडावर ठेवतात का?" अशाप्रकारे माकडाने आपला जीव वाचवला.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
चैताली शेखर चव्हाण छान आहे गोष्ट हुशार मगर
ReplyDeleteहुशार मगर
ReplyDeleteहुशार माकड
ReplyDeleteहुशार माकड .
ReplyDeletePost a Comment