सिंह आणि उंदीर
एकदा एक सिंह झाडाखाली झोपला होता. उंदराने त्याला पाहिले. उंदीर सिंहाच्या अंगावर, शेपटीवर, तोंडावर उड्या मारू लागला. उंदीर सिंहाच्या अंगावर मजेत खेळत होता. तेवढ्यात सिंहाला जाग आली. आपल्या पंजात चिटुकल्या उंदराला सिंहाने पकडले.
सिंह रागाने म्हणाला, "पिटुकल्या उंदरा, मला त्रास देण्याचे तुझे धाडस कसे झाले? आता मी तुला शिक्षा करतो. मी तुला खाऊन टाकतो." उंदीर घाबरला. तो सुटण्यासाठी धडपडू लागला. त्याने सिंहाला विनंती केली, " महाराज मी खरच क्षमा मागतो. मला माफ करा. मला जाऊ द्या. मी कधीतरी तुमच्या मदतीला येईल".सिंह हसला आणि म्हणाला, खरंच काय? तू पिटुकला उंदीर माझी काय मदत करणार, आणि सिंहाने उंदराला सोडले. "धन्यवाद मित्रा. खूपखूप आभार, उंदीर म्हणाला आणि लगेच जंगलात पळून गेला. थोड्या दिवसानंतर सिंह शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला.
तो मोठ्याने गर्जना करू लागला. उंदराने सिंहाचा आवाज ओळखला. तो धावतच सिंहाकडे गेला. सिंह जाळ्यात अडकला होता. उंदराने आपल्या मित्रांना बोलवले. सर्व उंदरांनी ते जाळे कुरतडण्यास सुरुवात केली. त्यांनी सिंहाला जाळ्यातून मुक्त केले. सिंह म्हणाला, "धन्यवाद माझ्या पिटुकल्या मित्रा. तू मला वाचवलेस. खरंच तू लहान असूनही माझ्या उपयोगी आला". आता दोघे मित्र झाले.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
AKRAM
ReplyDeletePost a Comment