चल रे भोपळ्या...
एक होती आजी. ती निघाली लेकीकडे. तिच्या लेकीचे गाव होते जंगलाच्या पलीकडे. ती जंगलातून वाट काढत, काढत निघाली. वाटेत तिला भेटला वाघोबा. वाघोबा तिला पाहून म्हणाला, "म्हातारे मी तुला खाणार. म्हातारी मनातून खूप घाबरली. परंतु, वाघोबाला तसे न दाखवता ती म्हणाली, "मी म्हातारी मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा तू थोडे थांब. मी लेकीकडे जाते तूप रोटी खाते जाडजूड होते, मग मला खा. वाघोबा म्हणाला ठीक आआहे. पुढे तिला भेटला कोल्हा. कोल्हा म्हणाला, "म्हातारे, मी तुला खाणार. ती कोल्ह्याला म्हणाली, "मला खाऊन तुझे पोट भरणार नाही, त्यापेक्षा थोडे थांब." मी लेकीकडे जाते तूप रोटी खाते जाडजूड होती, मग मला खा. त्याला ते पटले. तो म्हणाला ठीक आहे. लेकीच्या घरी आठ-दहा दिवस म्हातारी राहिली. तिला रोज तूप रोटी आणि चांगले पदार्थ लेकीने खाऊ घातले. म्हातारी जाडजूड झाली.
म्हातारी लेकीला म्हणाली, "आता मी जाते." लेकीने म्हातारीला एक मोठा भोपळा दिला. म्हातारी भोपळ्यात बसली आणि जंगलातून जाऊ लागली. चल रे भोपळ्या टुणुक टुणुक, चल रे भोपळ्या टुणुक टुणुक. भोपळा पाहून कोल्ह्याला संशयाला. तो भोपळ्याला म्हणाला तू म्हातारी पाहिलीस का? भोपळ्याच्या आतून आवाज आला, म्हातारी बितारी मला नाही माहिती, चल रे भोपळ्या टुणुक टुणुक. भोपळा पळू लागला. थोडे पुढे गेल्यावर वाटेत वाघोबा भेटला. वाघोबाला ही भोपळा पाहून संशय आला. त्याने विचारले काय रे भोपळ्या म्हातारीला पाहिले का? भोपळ्यातुन आवाजा आला म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणुक टुणुक. भोपळा पळू लागला. पण वाघ आणि कोल्ह्याला भोपळ्याच्या आवाजाचा संशय आला. ते दोघे भोपळ्याच्या मागे धावू लागले. त्यांनी भोपळा अडवला व भोपळ्यातून म्हातारीला बाहेर काढलं. मी खाणार, मी खाणार म्हणून दोघेही भांडू लागले. मग म्हातारी म्हणाली, "तुम्ही दोघे आधी ठरवा, कोण मला खाणार? " वाघ आणि कोल्हा भांडत बसले. त्यांचे भांडण पाहून म्हातारी भोपळ्यात बसली आणि आपल्या घरी सुखरूप पोहचली.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Manasi Sagar kamble
ReplyDeletePost a Comment