खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीर उंदीर.
त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा, असे गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही.
शेजारच्या गावातील एका बासरी वाल्याला कळते. तो या गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो, की मी या उंदरांचा बंदोबस्त करतो. तुम्ही मला त्या बदल्यात शंभर सुवर्णमुद्रा द्या. गावकरी तयार होतात. मग तो बासरीवाला बासरी वाजवत गावात हिंडू लागतो.
त्याच्या बासरीच्या सुरामुळे सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात. व त्याच्या मागे धावू लागतात. तो तसाच नदीत जातो. त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरतात.
बासरीवाला गावकऱ्यांना आपली बिदागी मागतो. मात्र गावकरी शंभर सुवर्णमुद्रा द्यायला नकार देतात. बासरी वाल्याला गावकऱ्यांची लबाडी समजते. तो म्हणतो ठीक आहे. आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते पहा. तो पुन्हा बासरी वाजवत गावात फिरू लागतो, या वेळी त्याच्या बासरीचे सूर ऐकून लहान मुले त्यांच्याकडे आकर्षिले जातात. ती त्याच्या मागे धावू लागतात.
गावकऱ्यांना भीती वाटते की उंदरा प्रमाणे तो आपल्या मुलांनाही नदीत नेऊन बुडवेल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवून शंभर सुवर्णमुद्रा देतात.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment