रेघ लहान झाली
अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते. चालता चालता बादशहा अचानक थांबला. बादशहाने वाळूत बोटाने एक रेघ मारली आणि बिरबलाला विचारले, "ही रेघ पाहिलीस? ही रेघ लहान करायची; पण पुसायची नाही.जमेल तुला?" बिरबलाने एक वेळ बादशहाकडे व एक वेळ रेघेकडे पाहिले. थोडा विचार केला.
पटकन खाली वाकला. शेजारी दुसरी लांब रेघ मारली आणि म्हणाला, "महाराज, झाली की नाही तुमची रेघ लहान?" बादशहा चकित होऊन पाहतच राहिला!
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment