श्रीपती आणि त्याची धाकटी बहीण तारा शेतात काम करत होते. त्यावेळी श्रीपतीला साप चावला. चावल्यानंतर साप लगेच वळवळत निघून गेला. दोघांनी साप नीट पाहिला नाही. पण साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला. त्याने मोठ्याने आरडाओरडा केला. आजूबाजूचे लोक धावत आले.
"तारा म्हणत होती श्रीपतीला ताबडतोब तालुक्याच्या गावी न्यायला हवे. सापाच्या विषावर उतारा असणारे इंजेक्शन तिथल्या सरकारी दवाखान्यात मिळते. ते श्रीपत तिला द्यायला हवे." ताराच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. लोकांनी घाईघाईने बैलगाडी जोडली. श्रीपतीला बैलगाडीत घातले. तातडीने गावातल्या देवळात आणले.
गावच्या मांत्रिकाला बोलावले. मांत्रिकाने श्रीपतीला लिंबाच्या पाल्यावर झोपवले. मांत्रिक विष उतरवण्याचा मंत्र म्हणू लागला.
नंतर श्रीपतीला बरे वाटू लागले. खरंच श्रीपती मांत्रिकाच्या मंत्रामुळे बरा झाला, की सापच बिनविषारी होता. तुम्हाला काय वाटते?
श्रीपतीला मांत्रिकाकडे न्यायला हवे होते की डॉक्टरकडे?
चैताली शेखर चव्हाण
ReplyDeletePost a Comment