लोभी कुत्रा
एका कुत्र्याला खूप भूक लागलेली होती.तेव्हा त्याला रस्त्याने चालताना एक पोळी सापडते. त्याला एकट्यालाच ती पोळी खायची होती, त्यामुळे सर्वांच्या नजरा चुकवून आपल्या तोंडात ती पोळी धरून तो धावू लागला. धावता-धावता तो एका पुलावर येऊन थांबला. पुलाखाली खूप पाणी होते. कुत्र्याने पाण्यात पाहिले. त्याला पाण्यात एक कुत्रा दिसला. त्याच्याही तोंडात भाकरीचा तुकडा होता! त्याला वाटले, पाण्यातल्या कुत्र्याच्या तोंडातून आपण भाकरीचा तुकडा हिसकावून घ्यावा, तो तोंड उघडून भुंकू लागला,तोच त्याच्या तोंडातून भाकरीचा तुकडा पाण्यात पडला, त्याच्या जवळील भाकरी तीदेखील त्याला मिळाली नाही आणि पाण्यातील भाकरी देखील मिळाली नाही म्हणजेच त्याच्या हावरटपणा मुळे त्याच्या लोभामुळे त्याने हातची भाकरी देखील गमावली होती.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment