कोल्हा व करकोचा
एका जंगलात एक कोल्हा व करकोचा राहत होते. त्या दोघांची खूप मैत्री होती. कोल्हा करकोचाला त्याच्या शिकारीच्या गमतीजमती सांगत असे. करकोचाही कोल्ह्याला पाखरांच्या गमतीजमती सांगत.
एक दिवस कोल्ह्याला वाटले करकोच्याची गंमत करावी. कोल्हा म्हणाला, "मित्रा माझ्या घरी छानशी माशाची भाजी केली आहे, तू जेवायला ये. "करकोचालाही मासे खुप आवडत होते. त्यामुळे तो लगेच तयार झाला. संध्याकाळी करकोचा कोल्ह्याच्या घरी गेला. माशांचा छान वास सुटला होता. करकोच्याच्या जिभेला पाणी सुटले. कोल्ह्याने ताटामध्ये माशाची भाजी वाढली. दोघेही जेवण करू लागले. परंतु करकोच्याची चोच लांब होती त्याला भाजी काही खाता येईना. कोल्ह्याने स्वतःच्या ताटातील भाजी तर खाल्लीच पण करकोचाच्या ताटातील ही भाजी खाल्ली. करकोचा समजला कोल्ह्याने आपली गंमत केली. जाताना करकोचा कोल्ह्याला म्हणाला, "कोल्हे दादा उद्या माझ्या घरी या, छान खीर बनवतो".खिरीचे नाव ऐकताच त्याच्या तोंडाला पाणी सुटले. दुसर्यादिवशी कोल्हा करकोचा च्या घरी गेला. करकोचाने खीर सूरई मध्ये वाढली. लांब चोचीने करकोचाने खीर पटपट खाल्ली. पण कोल्ह्याला मात्र खीर खाता येईना. कोल्ह्याला समजले मित्राने आपली गंमत केली.दोघेही खूप हसले आणि जंगलात निघून गेले.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment