एका रानात ससा व कासव हे दोन्ही मित्र राहत होते.एकदा दोघेजण सोबत खेळत असताना ससा कासवाला म्हणाला, "अरे मित्रा, तू किती हळू चालतोस." यावर कासव म्हणाले, "चल, आपण दोघं शर्यत लावू." कासवाचे बोलणे ऐकून ससा जोरजोराने हसू लागला.ससा म्हणाला, "ठीक आहे, ते समोरचे आंब्याचे झाड दिसते ना तिथे अगोदर जो पोहोचेल तो जिंकला. " शर्यत सुरु झाली. ससा लांब उड्या मारत जोरात पळू लागला. कासव मात्र हळूहळू चालत होते. ससा थोडा पुढे गेला, तसे त्याने मागे वळून पाहिले. कासव खूप मागे राहिले होते. सशाला थोडी भूक लागली होती. चला, कासव येईपर्यंत आपण काही तरी खाऊ या. त्याला समोरच भाजी दिसली. त्याने पोटभर भाजी खाल्ली. पोट भरल्यामुळे त्याला झोप येऊ लागली. तो झाडाच्या सावली शांतपणे झोपला. कासव मात्र न थांबता चालत राहिले. कासव न थांबता चालत, चालत आंब्याच्या झाडाखाली पोहोचले. दिवस मावळला. पक्षांचा किलबिल आवाज येऊ लागला. ससा जागा झाला. त्याने मागे पाहिले कासव दिसले नाही. तो जोराने आंब्याच्या झाडाकडे पळू लागला. आंब्याच्या झाडा जवळ आला आणि समोर पाहतो तर काय? कासव त्याच्या अगोदर झाडाखाली पोचले होते. ससा थांबला म्हणून शर्यत हरला.
Post a Comment