दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ
एका जंगलामध्ये दोन मांजरी होत्या. एक काळी आणि एक पांढरी मांजर होती. त्या दोघींना एक लोण्याचा गोळा सापडला लोण्याच्या गोळ्या वरून दोघांचे भांडण सुरू झाले. काळी मांजर म्हणाली," मी सगळे लोणी खाणार." पांढरी मांजर म्हणाली," मी सगळे लोणी खाणार."
त्यांचे काही भांडण मिटेना. म्हणून त्या गेल्या माकड दादाकडे. माकड दादाला म्हणाल्या," माकड दादा, माकड दादा आमचे भांडण मिटवा." माकड दादा म्हणाले,"हो सोडवतो कि, आणा तो लोण्याचा गोळा इकडे." माकडाने लगेच एक तराजू आणला. लोण्याचे दोन भाग केले. तराजूच्या एका पारड्यात एक गोळा व दुसऱ्या व पारड्यात दुसरा गोळा ठेवला. माप केले तर एक गोळा लहान व एक गोळा मोठा होता. माकडाने जास्त असलेला गोळा थोडा कमी करावा म्हणून तो खाल्ला. आता दुसऱ्या पारड्यातील गोळा मोठा झाला आणि एक छोटा राहिला म्हणून जास्त मोठा असलेला गोळा त्यातलेही काही लोणी माकडाने खाल्ले. असे करत करत माकडाने सगळे लोणी खाऊन घेतले.
मांजरीना तर काहीच कळेना, थोडेसे तरी लोणी खायला मिळेल की नाही म्हणून त्या माकडाकडे पाहातच राहिल्या.
माकड मात्र सगळे लोणी खाऊन पळून गेले. दोघांच्या भांडणात मात्र तिसऱ्याचा लाभ झाला.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment