खरी मैत्री
कावळा, हरिण, उंदिर व कासव हे तिन मित्र होते. हरीण, उंदीर,कावळा तळ्याच्या काठी यायचे आणि मग खूप दंगामस्ती करायचे. एक दिवस शिकाऱ्याने कासवाला पकडले व घेऊन निघाला. हे झाडावर बसलेल्या कावळ्याने पहिले. शिकारी आपल्या मित्राला घेऊन जात आहे, ही बातमी कावळ्याने मित्रांना सांगितले. कावळा म्हणाला, "मित्रांनो, आपल्या मित्राला सोडवले पाहिजे. त्यासाठी मी एक युक्ती सांगतो" कावळ्याने सांगितल्याप्रमाणे शिकारी ज्या वाटेने गेला आहे त्या वाटेवर तळ्याकाठी हरिण मेल्यासारखे गुपचूप पडून रहीले. कावळा हरिणाच्या अंगावर बसून चोचीने मारल्यासारखे करू लागला. शिकाऱ्याने मेलेल्या हरिणाला पाहिले. त्याला वाटले आता आयतीच शिकार सापडली. त्याने पाठीवरील कासवाची पिशवी खाली ठेवली आणि हरीणाकडे जाऊ लागला.तेवढ्यात उंदराने पिशवीचे तोंड कुरतडून कासवाला मोकळे केले. कासव पटकन शेजारच्या तलावात गेले. शिकारी हरिणाच्या जवळ जाईपर्यंत कावळा उडुन झाडावर गेला. हरिण पटकन उठले आणि जंगलात पळून गेले. उंदीर बिळात गेला. शिकाऱ्याने पाठीमागे वळून पाहिले तर पिशवीतील कासव ही निघून गेले होते. शिकाऱ्याला समजले आपली फसगत झाली. अशा प्रकारे मित्रांनी कासवाचा जीव वाचवला
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
छान आहे गोष्ट
ReplyDeleteछान आहे
ReplyDeleteVery good
ReplyDeletePost a Comment