संत गाडगेबाबा
संत गाडगेबाबा दिवसभर गावातील घाण साफ करायचे आणि रात्री लोकांच्या डोक्यात साचलेली घाण कीर्तनाच्या माध्यमातून साफ करायचे.असेच एकदा त्यांनी पाहिले, दुपारच्यावेळी लोक चावडीकडे जात आहेत.म्हणून त्यांनी एका माणसाला विचारले, काय आहे तिकडे? त्या माणसाने सांगितले, एक चमत्कारिक साधू आला आहे.गाडगेबाबा समजून गेले.ते चावडीकडे गेले.त्यांनी पाहिले, एक अगडबंब माणूस पुढे बसला होता.लोक त्याच्या पाया पडत होते.एक व्यक्ती पुढे आली व त्याने त्या साधूला विचारले, महाराज तुमचे वय किती? साधू म्हणाले, मला वय सांगता येणार नाही, मात्र मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आयोध्येचा राजा रामाचे लग्न होते. आलिशान मंडप दिलेला होता. सर्वत्र झगमगाट होता. त्यावेळेस राम सीतेला आशीर्वाद देण्यास मी तिथे होतो. त्यावेळेस माझ्या दाढीचे केस काळे होते. लोकांना फार आनंद झाला. ते साधू महाराजांचा जयजयकार करू लागले. गाडगेबाबांनी ओळखले हा साफ खोटे बोलतोय. गाडगेबाबा लोकांच्या गर्दीतून वाट काढत पुढे गेले व त्याला खराट्याने मारू लागले. लोकांनी बाबांना विचारले, तुम्ही का मारता? बाबा म्हणाले, साधु महाराज सांगतात ते बरोबर आहे. परंतु त्यावेळेस साधू महाराजांनी माझा खराटा हाती घेतला तो मला दिलाच नाही. त्यांना त्यावेळे पासून मी शोधत आहे. ते आता मला सापडले. साधू महाराजांनी ओळखून घेतले बाबांनी आपले लबाडी पकडली,आणि लोकांच्या डोळ्यातही झणझणीत अंजन घातले.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment