ससा व सिंह
जंगलाचा राजा सिंह होता. तरी सुद्धा तो अजिबात राजासारखा वागत नव्हता. तो नेहमीच जंगलातील प्राण्यांची शिकार करत असे. त्यांना खूप त्रास देत असे. सिंहाच्या या वागण्याला सर्वजण खूप कंटाळले होते. सर्वजण खूपच धास्तावले होते. सर्वांनी जंगलामध्ये एक सभा घेतली. आणि एक उपाय शोधून काढला. ते सिंहाला म्हणाले की, "आम्ही रोज तुमच्याकडे एक प्राणी पाठवत जाऊ. तुम्ही फक्त त्याचीच शिकार करा." त्यावर सिंह ठीक आहे म्हणाला.
दुसऱ्या दिवशी पहिलाच नंबर सशाचा आला. ठरलेल्या वेळेपेक्षा ससा खूपच उशिरा सिंहाकडे गेला. सशाला उशिरा आल्यामुळे सिंहाला खूप राग आला होता. त्याने साश्याला विचारले "एवढा उशीर का झाला तुला यायला? "त्यावर ससा म्हणाला "महाराज तुमच्यासारखाच एक दुसरा सिंह या जंगलांमध्ये आहे. आणि तो तुम्हाला खूप वाईट बोलत होता. तुम्हाला दूषण देत होता." हे ऐकून सिंहाला खूप राग आला. त्यावर सिंह सशाला म्हणाला "कुठे आहे तो? मला दाखव."
ससा त्याला घेऊन एका विहिरीच्या जवळ आला. आणि म्हणाला "महाराज या विहिरी मध्ये आहे तो. तुम्हाला पाहून घाबरून विहिरीमध्ये लपून बसला आहे."सिंहाने त्या विहिरी मध्ये डोकावून पाहिले. तर त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसले. आणि त्याला असे वाटले की खरंच दुसराच सिंह आहे. तो त्याच्यावर खूप रागावला आणि चवताळून त्याच्या अंगावर झेप घ्यावी म्हणून त्याने पाण्यात उडी मारली आणि तो स्वतः पाण्यामध्ये पडून मरून गेला. अशा प्रकारे पिटुकल्या सशामुळे इतर सर्व प्राण्यांचे जीव वाचले होते सर्व प्राणी सशाच्या या हुशारीमुळे खूप खुश झाले. आनंदी झाले.
तात्पर्य:शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ!!!!
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Good
ReplyDeletePost a Comment