चतुर हिराबाई
पहाट झाली. माणिक झोपेतून उठला. बाहेर पाहिले. दोन बैलांनी पैकी एकच बैल दिसला. माणिकने बायकोला हाक मारली. दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला; पण बैल सापडला नाही. दुसरा बैल चोरीला गेला होता. माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले.
अचानक हिराबाई ओरडली, "अहो! हा पाहा आपला बैल. चोर सापडला. "आवाज एकूण चोर घाबरला. तसे न दाखवता तो बोलला, "हा बैल माझाच आहे. "दोघे भांडू लागली. हिराबाई चतुर होती. तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले. चोराला विचारले, "बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग. बरोबर सांगितले तर बैल तुझा. "चोराने अगोदर उजवा मग डाव असे सांगितले. हिराबाईने हात बाजूला केला. बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले. लोकांनी चोराला पकडले. पोलीस आले. चोराला घेऊन गेले. माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment