मांजरांची दहीहंडी
एक होती आजीबाई.तिची एक नात होती.दोघींनाही मांजरांची खूप खूप आवड होती.आजीबाईकडे चार मांजरे होती. एकाचे नाव होते बोकोबा, दुसरा होता सोकोबा, तिसरा होता काळोबा आणि चौथा साळोबा. एकदा काय झाले! आजीबाई गेली बाजारात. मांजरे होती घरात. आजीबाईने लोणी उंचावर ठेवले होते. ते मांजरांनी पाहिले होते. त्यांना लोणी मिळवायचे होते. उडी मारली तर आवाज होईल आणि सगळा बेत फुकट जाईल. मग बोकोबाने बोलावले सोकोबाला. सोकोबा ने हाक मारली काळोबाला आणि साळोबाला. आता बोकोबा, सोकोबा, काळोबा व साळोबा सारे जमले. पण लोणी मिळवायचे कसे? सगळे विचार करू लागले. छोटा साळोबा फार हुशार. तो सांगू लागला, "बोकोबा, आपण एकावर एक असे उभे राहू. "
झाले! बेत ठरला आणि बोकोबा वर सोकोबा, सोकोबावर काळोबा, काळोबावर साडोबा अशी दहीहंडी तयार झाली. पलीकडे माधुरी झोपली होती. तिला अचानक जाग आली. तो काय गंमत ,समोर मांजरांची दहीहंडी!
तिला खूप मजा वाटली. तिने इकडेतिकडे पाहिले. तोच आजी दारात दिसली. माधुरी आनंदाने ओरडली. "आजी, आजी लवकर ये, मांजरांची दहीहंडी पाहून घे. "
मांजरे एकदम घाबरली आणि लोणी टाकून पळाली.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment