बेईमान शिरे बहुत झाली, रयतेच्या दुःखास पारावर नाही. येरे शिवबा जन्मास पुन्हा, एकाही म्यानात तलवार नाही.
रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यासंह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली, पण केवढे अवघड कार्य होते ते। दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्याचा सिद्दी अशा चार सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. या सत्तांचा दरारा मोठा होता. त्यांच्याविरुद्ध लढणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता. कुठे शत्रूच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्प बळ. पण शिवरायांचा निश्चय अढळ होता. त्यातूनच त्यांना बळ निर्माण झाले.
पुण्याच्या नैऋत्येला कानद खोऱ्यात एक किल्ला होता. किल्ला मोठा बाका. त्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या. शिवरायांनी सवंगड्यांसह हा किल्ला अतिशय शिताफीने ताब्यात घेतला. किल्ल्यावर तोरणाई देवीचे मंदिर होते, म्हणून त्या किल्ल्याला तोरणा किल्ला म्हणत. तोरणा जिंकून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले.
जय जिजाऊ, जय शिवराय।
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment