मिडास राजाची गोष्ट
प्राचीन काळात मिडास नावाचा राजा होता. या राजाला सोन्याच्या वस्तूंची खूपच आवड होती. सोन्याची वस्तू पहिली की, तो खूप आनंदी व्हायचा. त्याने तप करून देवाला प्रसन्न करून घेतले. देवाने मिडास राजाला विचारले, "राजा तुला काय पाहिजे?" राजा ने सांगितले, देवा! मी ज्या वस्तूला हात लावेन, ती वस्तू सोन्याची व्हावी असे वरदान मला दे. देव तथास्तु म्हणाला. राजा आपल्या महाली आला. त्याने आपल्या महालाच्या दरवाजाला हात लावला. ते दरवाजे सोन्याचे झाले. त्यांनी खिडक्या आणि खांबांना हात लावला. तेही सोन्याचे झाले. राजा खूप आनंदित झाला. त्याने महालातील प्रत्येक वस्तूला हात लावला. प्रत्येक वस्तू सोन्याची होऊ लागली. राजाचा आनंद गगनात मावेना. तेवढ्यात मिडास राजाची छोटीसी आवडती मुलगी पळत राजाजवळ आली. राजाने त्याला उचलून कडेवर घेतले. आणि काय आश्चर्य? ती मुलगी ही सोन्याची झाली. राजा घाबरला. खूप दुःखी झाला. सोन्याच्या हव्यासापोटी त्यांने आपल्या मुलीला गमावले होते. राजाला समजलं अति तेथे माती.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment