नक्कल आली अंगलट
एक कुंभार होता. त्याच्याजवळ एक गाढव आणि एक कुत्रा होता. कुत्रा घराची राखण करी. गाढव खूप काम करत असे. गाढव जड जड ओझी वाहत असे.पण कुंभार त्याचा जास्त लाड करत नव्हता.
कुत्रा रात्री घराची राखण करत असे आणि दिवसभर झोपत असे. मालक बाहेरून आला तर कुत्रा लगेच त्याच्या जवळ जायचा,शेपूट हलवायचा, त्याच्या अंगावर दोन पाय ठेवून उभा राहायचा. मालक कुत्र्याचा फार लाड करत असे.
गाढवाला वाटले आपणही कुत्र्यासारखे वागावे. मग कुंभार आपलेही खूप लाड करेल. एक दिवस कुंभार बाहेरून घरी आला. गाढवाने शेपूट हलवले, आपले पुढचे दोन्ही पाय त्याच्या पोटावर ठेवले, कुंभारा भोवती फिरू लागला. कुंभाराला त्याचा खूप राग आला. त्याला गाढवाचे दोन पाय खूप लागले. रागारागाने त्यांने काठी उचलली आणि गाढवाला खूप बदड बदड बदडले. गाढवाला कुत्र्याची नक्कल करणे खूपच महाग पडले.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment