हुशार स्वराज
स्वराज आज खूप आनंदात होता. रविवारची सुट्टी होती. आई आणि स्वराज मामाच्या गावाला निघाले होते. सकाळपासून गावाला जाण्याची तयारी चालू होती. बॅग भरून झाली होती. दोघे सगळे आवरून रेल्वेस्थानकावर आले.
गाडी येण्यास अजून अवकाश होता. तेवढ्यात स्वराजने आईला बिस्किट पुडा मागितला. बिस्किट पुडा मजेत खात इकडे तिकडे पाहत होता. येणारी रेल्वे, तिचा येणारा आवाज, लोकांचे बोलणे हे सगळे पाहून त्याला गंमत वाटत होती. तेवढ्यात त्याला एक माणूस आपली बॅग शेजारच्या बाकावर सोडून जाताना दिसला. त्याला आश्चर्य वाटलं, अशी आपली वस्तू कोणी कशीकाय सोडेल. तेवढ्या त्याला आठवलं, बाईंनी शाळेत सांगितलं होतं, कधी- कधी अशा बेवारस वस्तू मध्ये बॉम्ब किंवा इतर घातक वस्तू असू शकते. अशा वेळी आपण पोलिसांशी संपर्क केला पाहिजे. स्वराजने पटकन ही गोष्ट आईच्या लक्षात आणून दिली. आईनेही स्थानकावर असणाऱ्या पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना ती गोष्ट सांगितली. काही वेळातच बॉम्बशोधक पथक तेथे दाखल झाले. बॅगेची तपासणी केली तर, खरोखर त्यात स्फोटके आढळली. मोठा अनर्थ टळला होता. सर्वांनी स्वराजचे कौतुक केले. शाळेत शिकवलेल्या गोष्टीचे त्याने प्रत्यक्षात उपयोजन केले होते. कितीतरी मोठा अनर्थ स्वराज मुळे टळला होता.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
छान आहे
ReplyDeletePost a Comment