झोपाळा गेला उडून
एका तळ्यात दोन बेडूक होते. दोन्ही बेडुक खूप दंगामस्ती करायचे. खूप खेळायचे. पाण्यामध्ये इकडून तिकडे पळायचे. एक दिवस पाण्यामध्ये खेळत असताना त्यांना काहीतरी वेगळे दिसले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले. त्यांना पाण्यात दोन खांब दिसले.
बेडकांना खूप गंमत वाटली. त्यांनी विचार केला, या दोन खांबाचे आपल्याला काय करता येईल. त्यांना एक युक्ती सुचली. त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली. वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला. दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले. तोच काय गंमत झाली, अचानक तो झोपाळा उडू लागला.
ते दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत, हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटापट पाण्यात उड्या घेतल्या.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
Post a Comment