शिवरायांचे आठवावे रूप l शिवरायांचा आठवावा प्रताप
जिजाबाईंनी निश्चय केला की, त्यांचा शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य, म्हणजे स्वराज्य स्थापन करील. एक दिवस एक विलक्षण घटना घडली. शिवराय व आजूबाजूच्या खो-यातील काही मंडळी पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या रायरेश्वराच्या मंदिरात जमली. त्या अरण्यात, झाडाझुडपात लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात मावळे शिवरायांबरोबर कसले खलबते करत होते. शिवराय आवेशात मावळ्यांना बोलत होते. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. बोलता, बोलता ते थांबले. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, "बोला बालराजे, बोला, आपला मनोदय सांगा आम्हाला. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत." हो राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू! आमचे प्राणही देऊ! ते सारे तेजस्वी तरुण एका आवाजात बोलले. मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले.
एकेकाकडे पहात ते आनंदाने म्हणाले, "गड्यांनो! आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे, सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे. आपले हे ध्येय म्हणजे 'हिंदवी स्वराज्य'! तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परकीयांची गुलामी आता नको. उठा, या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. स्वराज्यस्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार". घडलेला प्रसंग शिवरायांनी जिजाबाईंना सांगितला. त्या माऊलीला धन्य धन्य वाटले. आपण मनात धरले ते बालराजे पूर्ण करणार. अशी आशा, असा विश्वास त्यांना वाटू लागला.
यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे .
आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी 'छत्रपतींचा '
इतिहास माहित पाहिजे.
जय जिजाऊ, जय शिवराय.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment