चतुर टोपीवाला
एका गावामध्ये एक टोपीवाला टोपी विकायला गेला होता. लाल ,पिवळ्या, हिरव्या, रंगबेरंगी टोप्या. टोप्या विकून टोपीवाला फार दमून गेला. त्याने विचार केला, जरा वेळ आराम करावा. म्हणुन तो एका झाडाखाली गेला. त्याने टोप्यांची पिशवी बाजूला ठेवली आणि तो झोपी गेला. त्या झाडावर खूप माकडे होती. माकडांनी पिशवीतील टोप्या उचलल्या आणि आपल्या डोक्यावर घातल्या. रंगीबेरंगी टोप्या घेऊन माकडे झाडावर जाऊन बसले.
थोड्या वेळाने टोपीवाल्याची झोप झाली.पाहतो तर काय?पिशवीत एकही टोपी नाही! टोपीवाल्याने झाडावर पाहिले,तर सगळ्या माकडांनी त्याच्या टोप्या डोक्यावर घातल्या होत्या. टोपीवाला त्यांना आपल्या टोप्या माघारी मागू लागला. टोपीवाला ओरडू लागला "माझ्या टोप्या द्या" टोपीवाल्याचे अनुकरण करत माकडे ही त्याच्यावर ओरडू लागली. त्याने एक दगड घेतला आणि माकडांना मारला. माकडांनीही झाडावरची फळे तोडली आणि त्याला मारू लागले. टोपीवाल्याने जवळ पडलेली एक काठी उचलली ती माकडांवर उगरली माकडांनीही झाडाच्या फांद्या मोडून त्याच्यावर उगरल्या. टोपीवाल्याच्या डोक्यात एक युक्ती आली! त्याने स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढून पिशवीत टाकली. माकडांनी ही लगेच स्वतःच्या डोक्यावरच्या टोप्या काढून खाली टाकल्या. टोपीवाल्याने त्या पटापट गोळा केल्या आणि पिशवीत भरल्या. टोप्या घ्या टोप्या म्हणत तो दुसऱ्या गावी टोप्या विकायला निघून गेला. अशाप्रकारे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरली.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment