गणपती आणि कार्तिक
गणपती आणि कार्तिक स्वामी या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? यावरून भांडण सुरू झाले. दोघेही आपले माता पिता शंकर-पार्वती यांच्या जवळ न्याय निवाडा करण्यासाठी गेले. शंकर-पार्वती यांनी दोघांची शर्यत घेण्याचे ठरवले. सर्वप्रथम जो पृथ्वीला प्रदक्षिणा घालील तो श्रेष्ठ. कार्तिकेय आपले वाहन मोर, यावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाला. गणराय मात्र तेथेच हात जोडून उभे राहिले. काही क्षणानंतर गणराया यांनी आपले माता पिता शंकर-पार्वती यांना प्रदक्षिणा घातली. थोड्यावेळात कार्तिक तिथे पोहोचला. मी प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा घालून आलो म्हणून मी श्रेष्ठ ठरलो, असे तो म्हणू लागला. मात्र पार्वतीने सांगितले, गणरायांनी बुद्धीचा उपयोग केला. त्याने आपल्या माता पिताला प्रदक्षिणा घातली. यामुळे गणराय जिंकले. गणपती श्रेष्ठ ठरला.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment