फुलपाखरे
आज चंदूला खूप भूक लागली होती. कारण आज दररोजच्यापेक्षा जरा जास्तच वेळ खेळला होता. आई भरभर चपात्या लाटत होती. चंदू आई समोर नाचत ,नाचत मैदानावर केलेल्या गमतीजमती सांगत होता. आई स्वयंपाक करता-करता कौतुकाने चंदूचे बोलणे ऐकून गालात हसत होती. चंदू आईला सांगू लागला. आज शाळेत वेगळीच गंमत झाली. आम्ही शाळेच्या भोवताली झाडे लावलेली आहेत. त्यात काही फुलझाडेही आहे. त्या फुलझाडांवर वेगवेगळ्या रंगांची फुलपाखरे येतात. आमच्यातील काही मुलांनी फुलपाखरे पकडली. काहींनी दोरे आणले आणि मग त्या फुलपाखराच्या पंखांना दोरे बांधून आम्ही ते फुलपाखरे पतंगासारखे ऊडवू लागलो. हे पाहून आमच्या बाई पळतच आल्या आणि त्यांनी अगोदर त्या फुलपाखरांना मोकळे केले.
सर्व मुलांना एकत्र करून त्या सांगू लागल्या, "हात नका लावू, फुलावर उडती फुलपाखरे". बाळांनो! आपल्यासारखाच या फुलपाखरांना ही जीव आहे. त्यांचे पंख नाजूक असतात. जर आपण असे दोरे बांधले तर त्यांचे पंख तुटतील. त्यांना उडता येणार नाही, आणि तुम्हाला माहिती आहे का? फुलपाखरे फुलांवर बसतात त्या फुलावरील काही परागकण त्यांच्या पायांना चिकटतात .ते जेव्हा दुसऱ्या फुलावर जाऊन बसतात त्या वेळेस ते कण त्या फुलावर पडतात. याला परागीकरण असं म्हटलं जातं. फुलपाखरं आपल्याला काहीच त्रास देत नाही. म्हणून आपणही त्यांना त्रास दिला नाही पाहिजे. मुक्या प्राण्यांवर प्रेम करायला शिका. बाईंनी सांगितलेले आम्हाला पटले. आई आता आम्ही नाही फुलपाखरे पकडत. आईला चंदूचे खूपच कौतुक वाटले.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
Post a Comment