श्रावण बाळ
श्रावण बाळ आपल्या आई-वडिलांना घेऊन काशी यात्रेला निघाला होता. त्याच्या आई-वडिलांना दृष्टी नव्हती. ते आंधळे होते. त्यांना काहीही दिसत नव्हते. त्यामुळे श्रावण बाळ त्यांना कावडी मध्ये बसवून काशीयात्रेला घेऊन निघाला होता. रस्त्याने जात असताना आई-वडिलांना खूप तहान लागली. म्हणून श्रावण बाळ थांबला त्यांना एका झाडाखाली बसवून तो पाणी आणायला गेला.पाणी आणत असताना पाण्यामध्ये त्याने घागर बुडवली. दिवसभर एकही शिकार मिळाली नाही म्हणून, अयोध्येचा राजा दशरथ नदीकाठी एका झाडावर येऊन बसला होता. पाण्याचा बुड बुड असा आवाज ऐकून त्याला असे वाटले की एखादा प्राणी पाणी प्यायला आला असेल. म्हणून न पाहता आवाजाच्या दिशेने त्यांनी बाण सोडला. बाण श्रावण बाळाला जाऊन लागला!! आई ग SS मेलो मेलो SS आवाज ऐकून दशरथ राजा आवाजाच्या दिशेने पळाला. तो आवाज प्राण्यांचा नसून एका माणसाचा होता. तो त्याच्या जवळ गेला व त्याला विचारले कुमार कोण आहेस तू? यावर श्रावण बाळ म्हणाला," मी श्रावण आहे.माझ्या आई वडिलांना पाणी घेऊन जाण्यासाठी मी आलो होतो. जवळच झाडाखाली माझे आई वडील बसलेले आहेत. त्यांना खूप तहान लागलेली आहे. एवढे पाणी तुम्ही त्यांना घेऊन जावा." एवढे बोलून श्रावण बाळाने आपले प्राण सोडले. हे पाहून राजा खूप घाबरून गेला.खूपच दुःखी झाला. दुखी अंतकरणाने तो, ती पाण्याची छोटी घागर घेऊन त्याच्या आई-वडिलांकडे निघाला. त्यांच्याजवळ पोहोचला तोच श्रावण बाळाचे वडील म्हणाले,"कोण? कोण आहे? बाळा तुला यायला एवढा उशीर का झाला? श्रावण बाळा तू बोलत का नाहीस?" हे ऐकून दशरथ राजाला खूपच वाईट वाटले. तो म्हणाला "माफ करा, पण मी तुमचा श्रावण बाळ नाही. मी दशरथ राजा आहे. त्याने घडलेली सर्व हकीकत सांगितली. व म्हणाला हे पाणी घ्या तुमच्या श्रावण बाळाने पाठवले आहे. श्रावण बाळ जिवंत राहिलेला नाही. हे ऐकून त्याचे आई-वडील खूप आक्रोश करू लागले. खूप रडू लागले आता आमचा बाळ उरला नाही तर आमच्या जगण्याला काही अर्थ नाही असे म्हणून त्यांनी राजाला श्राप दिला."आम्ही जसे पुत्र वियोगाने तडफडतो आहोत तसाच तुही पुत्र शोकाने मरशील!! असा शाप देऊन श्रावणाच्या आई वडिलांनी आपला प्राणत्याग केला. दशरथ राजा दुखी अंतकरणाने घरी निघून गेला व पुत्र वियोगाने म्हणजेच प्रभु रामचंद्रांच्या वीयोगाने दशरथ राजाचा पुढे अंत झाला.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment