माझी शाळा
आपल्या देशात खूप वर्षापूर्वी विद्यार्थी, मुले शिक्षकांच्या(गुरूंच्या) घरी शिक्षण घेण्यासाठी जात असत. काही वर्षे ते तेथे राहून शिक्षण घेत असत. नंतर स्वातंत्र्यपूर्व काळात गावामध्ये एक शिक्षक आणि विविध वयोगटातील विद्यार्थी एकत्र येत असत. शिक्षक त्यांना शिकवत असत. विद्यार्थी जमिनीवर अक्षरे, आकडे गिरवत असत. या काळात मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था दुर्मिळ होती. इंग्रजांनी सध्याची शाळा पद्धत आणल्यावर महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणास पुण्यातून सुरुवात केली. सावित्रीबाई फुले यांना त्या काळी खूप मोठा विरोध झाला. पण तरी त्यांनी मुलींना शिकवने सोडले नाही. आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुलींना पाहतो, ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नांमुळेच. आज आपल्याला शाळेमध्ये ग्रंथालय ,सुसज्ज इमारत, खेळण्यासाठी मैदान, शालेय साहित्य अशा सर्व सुविधा मिळतात.
प्रत्येक मुलाला आपली शाळा मनापासून आवडते.
ही आवडते मज मनापासुनी शाळा,
लाविते लळा ही, जशी माऊली बाळा।
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
Post a Comment