समस्यांवर स्वर हा!
मार्च महिना आला की सर्व मुलांना परीक्षांचे वेध लागतात. दहावी, बारावी आणि नंतर पहिली ते नववी या मुलांची परीक्षा असते. मित्रांनो, परीक्षा ही गोष्ट अशी आहे, कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येक जण साशंक असतोच. शेवटी तुमचं उच्च मनोबल हेच महत्त्वाचं ठरतं. उच्च दर्जाची सकारात्मक मानसिकता कायम ठेवा आणि मग पहा, यश तुमचंच आहे. मी यशस्वी होणार हा मंत्र सतत लक्षात ठेवा. परीक्षेच्या दिवशी मन शांत ठेवा. वर्षभर जर आपण चांगले कष्ट घेतले असतील, चांगला अभ्यास केला असेल, तर आपल्याला परीक्षा कठीण जाणार नाही.
जगात मोठी होणारी माणसा आपण सतत पाहत असतो. आपण सुद्धा असेच यशस्वी बनण्यासाठी धडपडत असतो. आपणही या यशस्वी लोकांचेच अनुकरण करतो. त्यांनी अवलंबिलेल्या अचूक जीवन मार्गाची आपण अचूक माहिती घेत नाही.
जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे खरं आहे. पण अशक्य ते शक्य होण्यासाठी योग्य त्या गोष्टीचं अनुकरण करणं फार महत्त्वाचं आहे. परीक्षा ही तुमच्या ज्ञानाची चाचपणी करण्याचा काळ असतो. म्हणून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न आपण निरंतर सुरू ठेवला पाहिजे. मग परीक्षेच्या कालावधीचा ताण आपल्याला कधीच जाणवणार नाही. आपण केवळ परीक्षेच्या दरम्यानच अभ्यासामध्ये आपल्याला गुंतवून ठेवतो. नेमके इथेच आपण कमी पडतो. परंतु यशस्वी होणारी व्यक्ती स्वत:ला निरंतर अभ्यास प्रक्रियेमध्ये गुंतवून ठेवते. जीवनात काहीतरी करून दाखविण्याच ध्येय लागणाऱ्यांनी, सतत अभ्यास व ज्ञान मिळवत राहिले पाहिजे. म्हणजे यश तुम्हाला सहज मिळेल. येणाऱ्या परीक्षेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
५३) समस्यांवर स्वार व्हा !
Post a Comment