दोस्त
माझी एक गाय होती, तिला होते वासरू,
तोच माझा दोस्त होता, त्याला कसे विसरू!
मीही व्हायचो गुबगुबीत दूध पिऊ- पिऊ,
दोघांसाठी एक पान्हा, आम्ही भाऊ- भाऊ.
दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उंडारला,
की माझा बाप पाठवायचा मलाच त्याला धुंडायला.
आम्ही असे उंडारताना भिंगरीच्या पायाने,
गाय पाहायची दोघांकडे सारख्याच मायेने.
हिरवे हिरवे गवत कोवळे लूस.
त्याच्यासाठी आणले की गडी व्हायचा खुश.
कोवळ्या- कोवळ्या जिभेने अंग माझे चाटायचा,
ओठावरचा फेस त्याच्या साय मला वाटायचा.
पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मी शाळेत,
माझाही गुंतलेला जीव त्याच्या नाळेत.
आज जेव्हा पाहतो मी भावा- भावाचं फाटताना
आठवत राहतो दोस्त माझा अंग माझं चाटताना.
इंद्रजित भालेराव-
मनोरंजक गोष्टी वाचा .
१) पुंगीवाला व मुले .
२) लोभी कुत्रा
३) एकीचे बळ .
४) कबुतर आणि मुंगी.
५) सिंह आणि उंदीर .
६) कोल्हा आणि उंट
७) योग्य कि अयोग्य
८) माकड आणि मगर
९) नदी काठचे भूत
१०) चतुर टोपीवाला
११) मिडास राजाची गोष्ट
१२) खरी मैत्री
१३) ससा व सिंह
१४) प्रयत्नांती परमेश्वर
१५) श्रावण बाळ
१६) गणपती आणि कार्तिकेय
१७) संत गाडगेबाबा
१८) रेघ लहान झाली
१९) चल रे भोपळ्या
२०) ससा आणि कासव
२१) कोल्हा व करकोचा
२२) हुशार कावळा
२३) संत गाडगेबाबा
२४) श्रीचक्रधर स्वामी
२५) वीरमाता जिजाबाई
२६) संत तुकाराम
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
२८) नेहमी खरे बोला
२९) नक्कल आली अंगलट
३०) शिवरायांचे आठवावे रूप ..
३१) स्वराज्याचे तोरण बांधले
३२) प्रतापगडावरील पराक्रम
३३) शर्थीने खिंड लढवली
३४) दोघांचे भांडण ...
३५) शायिस्ताखानाची फजिती
३६) चतुर हिराबाई
३७) मांजरांची दहीहंडी
३८) शेरास सव्वाशेर
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
४०) झोपाळा गेला उडून
४१) समजदार चंपक
४२) फुलपाखरे
४३) स्वराजची सतर्कता
४४) माझी शाळा
४५) वडेश बहरला
४६) न्याय
४७) एक भारतीय संशोधक
४८) सूर्याचे गर्व हरण
४९) बुडबुड घागर
५०) चिटुक उंदीर
५१) मधमाशीने केली कमाल
५२) वाटणा,फुटाणा..
५३) समस्यांवर स्वार व्हा !
५४) वेड कोकरू
Post a Comment