दयाळू गौतम
मिथीला नावाचे एक संपन्न राज्य होते. राजाला दोन मुले होती. एकाचे नाव होते देवदत्त. दुसर्या राजपुत्राचे नाव गौतम असे होते. देवदत्त अतिशय लोभी, लबाड ,क्रूर आणि दुष्ट होता. तर, गौतम अतिशय शांत, सदविवेकबुद्धीचा असा होता. एक दिवस गौतम राजवाड्या लगत असलेल्या बागेत खेळत होता. त्याने आकाशात पाहिले, तर एक हंस पक्षी आनंदाने आकाशात विहार करत होता. हे दृश्य अतिशय मनमोहक असे होते. त्याच बागेत देवदत्त होता. त्याने त्या हंसाला पाहिले आणि आपल्या धनुष्याला बाण लावला. बाण सू-सू-सू करत गेला.
त्याने त्या हंसाचा वेध घेतला. गौतम आणि देवदत्त दोघेही त्या हंसाचा ताबा घेण्यास धावले. गौतमाने त्या हंसाला उचलले.
त्याला लागलेला बाण काढाला. त्याच्या जखमेवर कापड बांधले. त्याला पाणी पाजले. त्या हंसाला जीवदान मिळाले. तेवढ्यात देवदत्त धापा टाकत त्या ठिकाणी येऊन पोहोचला. "तो हंस माझा आहे. त्याला मी मारले आहे. तो मला दे." असे देवदत्त गौतमाला म्हणाला. हंस अधिकच गौतमाला बिलगला. गौतमाने देवदत्तला हंस देण्यास नकार दिला. दोघांचे भांडण राजाकडे गेले. देवदत्त म्हणाला, "हंसाचा वेध माझ्या बाणाने घेतला आहे. म्हणून तो माझा आहे. गौतम म्हणाला, "हंसाचा जीव मी वाचवला आहे. त्यामुळे त्याच्यावर माझा हक्क आहे."राजाने निवाडा केला. मारणा-या पेक्षा जीवदान देणारा श्रेष्ठ असतो. त्यामुळे त्या हंसावर गौतमाचा अधिकार आहे. मुलांनो प्राणीमात्रावर नेहमी दया करावी.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment