नाक दाबले की तोंड उघडते
बाळू आमचा फार गमतीचा.कधी काय करेल याचा भरवसा नाही.कधी कोणाच्या खोड्या तर कधी काहीतरी उचापती. बाळू नेहमी असे काहीतरी करत असतो. आज बाळूची मावशी येणार होती. बाळू खूपच खुशीत होता. मावशी येणार म्हटल्यावर, मावशी खाऊ आणणार, आणि बाळू खाऊवर तुटून पडणार. दुपार झाली. बाळूची मावशी हातात पिशवी घेऊन आली. बाळू धावतच गेला. मावशीच्या हातातील पिशवी घेतली आणि तो पळाला. सगळे बाळूला पाहून हसू लागले. अरे बाळू, थोडा दम काढ, असे म्हणत आईने बाळूच्या हातातील पिशवी बाजूला टेबलवर ठेवली. बाळू मात्र नाराज होवून त्या पिशवीकडे पहात गपचूप बसला. थोड्या वेळाने आई, मावशी, बाबा गप्पांमध्ये रंगले. बाळू हळूच पिशवी जवळ गेला. पिशवीत एक डबा होता. त्याने उघडून पाहिले तर, डब्यामध्ये छान लाडू होते. लाडू तर बाळूला खूप आवडायचे. बाळूने पटापट एक-दोन-तीन-चार लाडू आपल्या तोंडामध्ये कोंबले. पण आता झाली का पंचाईत? बाळूला लाडू चावता येईना. तोंड मिटले गेले हे ताईने पाहिले. ताई ओरडतच आईकडे गेली. आईला म्हणाली, "अगं आई! बाळुचा बघ कसा हनुमान झालाय?"सगळे धावत बाळूकडे आले. पाहतात तर बाळूचे तोंड गच्च भरलेले. आई ओरडू लागली अरे बाळू तोंड उघड। पण बाळूला तोंड काही उघडता येईना. सगळे बाळूला तोंड उघडण्यासाठी सांगू लागले. पण बाळूची पंचाईत झाली होती. पण बाळू काही तोंड उघडेना. तेवढ्यात बाबा तिकडे आले. बाबांनी पहिले बाळूच्या तोंडात काहीतरी आहे,आणि बाळूला तोंड उघडता येईलना. बाबा हसले. बाबांनी पटकन बाळूचे नाक दाबले, आणि काय आश्चर्य! बाळूचे तोंड उघडले. तोंडातून पटापट एक-दोन-तीन लाडू खाली पडले. सगळे हसायला लागले. नाक दाबले की तोंड उघडते.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment