होळी, धुलीवंदन
फाल्गुन पौर्णिमा या दिवशी होळी हा सण येतो. होळी हा रंगीबेरंगी रंगांचा सण म्हणून ओळखला जातो. सर्व जाती धर्माचे, पंथाचे लोक होळी हा सण साजरा करतात. आपल्या मनातील राग, द्वेष विसरून प्रेमाच्या रंगाची उधळण करतात. होळी या सणादिवशी एकमेकांना रंग लावला जातो. तसेच होळी या सणा दिवशी वाईट चालीरिती व प्रथा यांची होळी केली जाते.
पूर्वीच्या काळी होळीच्या अगोदर गाईच्या शेणाच्या गोवऱ्या थापल्या जात व होळीच्या दिवशी त्या पेटवून होळी साजरी केली जाते. त्याची पडलेली राख दुसऱ्या दिवशी शेतात टाकत. मात्र, आता काही लोक झाडे तोडून त्याची होळी करतात. यामुळे पर्यावरणाचा नाश होतो. होळी साजरी करताना आपण पर्यावरणाचा नाश होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
होळी नंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते. धूळ म्हणजे जमीन. ज्या जमिनीवर आपण राहतो, ज्या जमिनीतून आपल्याला अन्नपदार्थ मिळतात त्या जमिनी विषयी आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धुलीवंदन. आपणा सर्वांना होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment