कोल्हयाला द्राक्ष आंबट
एक जंगल होते.त्या जंगलामध्ये वाघ, सिंह, हत्ती, कोल्हा, लांडगा असे प्राणी राहत होते.कोल्हा दिवसभर अन्नासाठी फिरत.मोठ्या प्राण्याने आणलेली शिकार व त्यातून राहिलेला वाटा तो शोधत असे.त्यावरच आपले पोट भरत असे.एक दिवस कोल्हा दिवसभर फिरला. त्याला काही शिकार मिळाली नाही. पोटात खूप भूक लागलेली होती. फिरता-फिरता तो
जंगलाबाहेर आला. त्या ठिकाणी त्याला द्राक्षाचा मळा दिसला. द्राक्षांच्या वेलीला छानदार द्राक्षांचे घड लटकले होते. कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले. द्राक्षे मिळवण्यासाठी तो धडपडू लागला. मात्र द्राक्ष वेलीवर उंचावर होते. कोल्हयाने खूप उड्या मारल्या पण त्याला द्राक्षाचा घड काही मिळवता येईना. शेवटी वैतागून कोल्हा म्हणाला, "छे रे बाबा! हे द्राक्षे आंबट आहेत, मला नको ते." म्हणूनच म्हण पडली कोल्हयाला द्राक्ष आंबट.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment