राजहंस
एका तळ्यात पाच बदकाची पिल्ले होती.पण एक पिल्लु हे खूप वेगळे होते. बाकीची चार भावंडे त्याला खूप चिडवत असत. तू खूप कुरूप आहेस असे म्हणत असत. ते कुरूप पिल्लू खूप नाराज होत असे. बाकीची भावंडे त्याला खेळायला घेत नव्हते.
एके दिवशी ते पिल्लु जंगलात निघुन गेले. तिथे त्याला कोंबडी व कोंबडीची पिल्ले दिसली. त्याला वाटले आपण यांच्या बरोबर राहावं. ते त्या पिल्लांशी बोलू लागले, " ए मला घेता का रे तुमच्यात खेळायला?" पण सगळे जण त्याला हसू लागले. " तू खूप कुरूप आहेस," म्हणून हिणवू लागले.
ते कुरूप पिल्लू बिचारे त्यांच्या पासून दूर निघून गेले.असेच काही दिवस गेले. सगळे त्याला कुरूप म्हणून चिडवत असत.
आता ते पिल्लु मोठं होऊ लागलं. अगदी डौलदार आणि सुंदर दिसू लागले. सर्वजण त्याला पाहतच राहिले. आता सर्वांच्या लक्ष्यात आले की ते पिल्लु बदक नसून एक राजहंस आहे.
म्हणूनच ते पिल्लु सगळ्यां पेक्षा वेगळ दिसत होत पण सगळे त्याला कुरूप म्हणत होते. आता सगळे त्याला प्रेमाने बोलत होते. त्याच्याशी मैत्री करत होते.
योग्य वेळेची वाट पहा.स्वत:चे अस्तित्व दाखवून द्या.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment