वडेश बहरला
चिंचपूर नावाचे गाव होते. गावाजवळ ओढा होता. तिथे एक झाड होते. झाडाचे नाव होते वडेश. वडेश उंच उंच वाढला होता. जणूकाही आभाळाला भिडला होता. आजूबाजूला खूप खूप पसरला होता. फांदीफांदीवर पानेच पाने होती. पाने हिरवीगार होती. झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची. झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू यायचे. किलबिल करत बोलायचे. गोड गाणी गायचे. वडेशला पाखरांची भाषा समजायची. तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा. पाखरांना पिले होती. चिमणीचे पिल्लू होते चिनू. कावळीणीचे पिल्लू होते कानू. पोपटाचे पिल्लू होते पिनू. पिले लपाछपी खेळत. पारंबी पकडून झोके घेत. खूप दंगा करत. दुपारी वडेची झोप मोडायची. तो वैतागून जायचा. पिलांवर रागवायचा. पिलांना सांगायचा.
उडा उंच भुर भुर
जा खूप दूर दूर
करता खूप कटकट
पिल्लांना वडेशचा राग यायचा. ते वडेशचे नाव आपल्या आई-बाबांना सांगायचे. वडेशकडे आता कोणीही जाईना. वडेशला काही करमेना.
चैत्र महिना आला. वडेशला नवी पालवी फुटली. पोपट, मैना , चिमणी, कावळा व त्यांची पिल्ले पुन्हा वडेशच्या जवळ आली. वडेशला आनंद झाला. वडेश बहरून गेला.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
Post a Comment