प्रेरणादायी इतिहास
आनंदवन जंगलामध्ये हत्ती, उंट, कोल्हा, सिंह, चिमणी हे सर्व प्राणी आनंदाने एकत्र राहत होते.कधी कोणाचे कोणाशी भांडण होत नसे.हे सर्व प्राणी आपल्या जंगलाची खूप काळजी घेत.पावसाळा सुरू झाला की जंगलामध्ये झाडे लावत.तळ्यातील पाणी त्या झाडांना घालत.जंगल खूप बहरले होते. एक दिवस, उन्हाळ्याच्या दिवसात त्या जंगलाला आग लागली. वणवा भडकला. सगळे प्राणी पळू लागले. दुसरी सुरक्षित जागा शोधू लागले.
चिमणी मात्र उडत- उडत तळ्यावर जात, आपल्या चिमुकल्या चोचीमध्ये पाणी आणत आणि त्या आगीवर टाकत. हत्तीने हे पाहिले. तो चिमणीला म्हणाला, "अगं चिटुकले चिमणी, तुझ्या चोचित किती पाणी येतंय? पाणी टाकता टाकता तू जळून जाशील. मरून जाशील. त्यावर चिमणी म्हणाली, हो खरे!
पण ज्या वेळेस इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझे नाव आग लावणा-यात नाही, तर आग विझवणा-यात असेल. हे ऐकून सर्व प्राणी तळ्यावर जाऊ लागले आणि पाणी आणून त्या आगीवर टाकू लागले. बघता बघता आग विझली. आनंदवन जंगल वाचले.
सर्व प्राणी पुन्हा त्या जंगलामध्ये आनंदाने राहू लागले.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment