फुग्या रे
फुग्या फुग्या फुगशील किती?
आभाळी उंच जाशील किती?
पक्ष्यांशी गोष्टी करशील किती?
वाऱ्याशी झुंज घेशील किती?
ढगांना पार करणार का?
ताऱ्यांची खोखो खेळणार का?
गेलास जर का उंचच फार
चंद्राच्या घरी मुक्काम मार
जोडून दे टेलिफोनची तार
रोजच रात्री गप्पांचा वार
मी म्हणेन, 'हॅलो हॅलो'
तिथून उत्तर, 'काय हो राव?'
खरंच ना पण तू वर जाणार?
की मधल्या मध्ये 'फट्' म्हणणार?
- वसुधा पाटील
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment