मी झाड बोलतोय...
तेजस दादा, ते बघ! आंब्याचा झाड.स्वराज, चल आपण आंबे पाडू. अरे! तेजस दादा, आंबे नाही अजून त्याला. छोट्या छोट्या चिमुकल्या कै-या आहेत. असू दे.तू दगड गोळा कर. आपण त्या कै-या पाडू. बरं! ठीक आहे. हे बघ. मी आणले दगड गोळा करून. बघ आता, मी कश्या कै-या पाडतो.
थांबा! थांबा! बाळांनो, अरे घाबरू नका. इकडे तिकडे बघु सुद्धा नका. मी झाड बोलतोय.तुमचं आंब्याचं झाड. तेजस दादा खरच की, झाड बोलतंय. हो ! खरंच मीच बोलतोय. अरे! मी तुम्हाला सावली देतो. माझ्या सावलीत तुम्ही खेळता, बागडता , लहानाचे मोठे सुद्धा माझ्या सावलीत झालात. मी तुम्हाला शुद्ध हवा देतो. वेळप्रसंगी तुमच्या घरासाठी लाकूड सुद्धा मीच देतो. या उन्हाळ्याच्या दिवसात मी गोड गोड आंबे सुद्धा देतो. माझे किती फायदे आहेत तुम्हाला? आता माझ्या फांद्यावर छोट्या छोट्या कैर्या लागलेल्या आहेत. तुम्ही अशी दगडं मारून मला दुखवता. छोट्या कै-या पाडता. मग मला सांगा, सगळ्या कै-या अशाच पाडल्या तर तुम्हाला गोड आंबे कसे मिळतील? बाळांनो! मलाही तुमच्यासारखा जीव आहे. माझे एवढे फायदे असताना तुम्ही असे का वागता? खरच की, झाडाचे आपल्याला किती फायदे आहेत. आपण त्या झाडाला जीव लावला पाहिजे. त्याच्याबरोबर प्रेमाने वागले पाहिजे. आपण त्याला पाणी घातले पाहिजे. विनाकारण त्याला दगड मारले नाही पाहिजे. तरच आपल्याला गोड गोड आंबे खायला मिळतील. आम्हाला माफ कर. आम्ही पुन्हा असे वागणार नाही. वा! खूपच हुशार आहात तुम्ही. या माझ्या सावलीत बसा. भरपूर खेळा आणि थोड्या दिवसानी नक्की या. मग मी तुम्हाला गोड गोड आंबे देईल.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment