सूर्य,चंद्र,तारे
सूर्य हा पृथ्वीचा सर्वात जवळचा तेजस्वी असा तारा आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वीप्रमाणेच सूर्याभोवती बुध, शुक्र ,पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस व नेपच्यून हे ग्रह फिरतात. सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास साधारण 365 किंवा 366 दिवस लागतात.यालाच आपण पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतो. या कालावधीला एक वर्ष असेही म्हणतात.
चंद्र
चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. तो पृथ्वीभोवती फिरत असतो. चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. मात्र सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो व तो प्रकाश परावर्तित होऊन आपल्याला दिसतो. ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो, त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात. त्यानंतर पंधरा दिवस चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. पंधराव्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही, त्या दिवसाला अमावस्या म्हणतात. अमावस्येच्या नंतर पंधरा दिवस चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो आणि पुढच्या पौर्णिमेला तो पुन्हा गोल गरगरीत दिसतो. दररोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात या आकारांना चंद्रकला म्हणतात.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment