कावळा करतो काव काव..
एका जंगलात निरनिराळे प्राणी राहत होते.ते एकमेकांना मदत करायचे.माणसे जंगलातील झाडे तोडत असल्याने त्यांना भीती वाटू लागली.
ते सगळे एका ठिकाणी जमून विचार करू लागले.तोच एक हरणाचे पाडस धावत आले.ते खूप घाबरले होते.त्याची आई विचारू लागली, "बाळा! काय झालं?"पाडस म्हणाले, "आई ग! आज मी कधीही न पाहिलेला एक प्राणी पाहिला."तो इकडे तिकडे फिरत होता.थोड्यावेळाने त्याने झाडे तोडायला सुरुवात केली.मी घाबरलो व पळत सुटलो.ते ऐकून माकड म्हणाले, "अरे तो प्राणी म्हणजे माणूस".त्याला कोणीतरी सांगितले पाहिजे, झाडे तोडू नको.स्वतःचा आणि आमचा विनाश करु नकोस.
कावळा म्हणाला, "मी सांगतो." कावळा उडत माणसाच्या वस्तीत गेला.माणसाला सांगू लागला, "कावळा करतो काव- काव माणसा एक तरी झाड लाव.झाडे काही तोडू नको सगळ्यांचा विनाश ओढवून नको."
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Nice
ReplyDeletePost a Comment